‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये महिन्याला दिले जात आहेत. आजवर जवळपास साडेसात हजार रुपयांची रक्कम महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यावर टाकण्यात आली. या योजनेमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. बाजारातील खरेदीसाठी महिलांची गर्दी हे याचे जिवंत उदाहरण ठरत आहे. काँग्रेस (Congress) आणि मित्रपक्ष स्वार्थी राजकारणासाठी ही योजना बंद पाडण्याचा डाव रचत आहेत. याला लाडक्या बहिणींकडूनच चपराक मिळत असल्याने काँग्रेस अनुत्तरित झाले आहे. या योजनेला काय उत्तर द्यावे यावरून काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे. या एका योजनमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार, असा विश्वास राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणूक काळात काँग्रेसने (Congress) ‘फेक नरेटिव्ह’च्या माध्यमातून लोकांमध्ये सरकारविरोधात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मुद्दे जुमलेबाजी असल्याचे लक्षात आल्यानंतर जनतेत रोष वाढला. हा रोष कायम असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये जागा वाटपावरून घमासान झाले. महाआघाडी तुटण्याची चिन्हे दिसू लागली. जागा वाटपातील हा वाद पाहून महाराष्ट्रातील जनता व्यथित झाली. त्यांच्या रुसव्या-फुगव्यांवर संतापली. त्यांच्यातील बंडखोरीने ही महाआघाडी स्थिर सरकार कसे देऊ शकणार, असा सवालही केला जात आहे. यातच लाडकी बहीण ही सर्वसामान्यांच्या हिताची योजना बंद करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. न्यायालयात जाऊन योजना बंद पाडण्याचा डाव रचला. यात यश मिळत नसल्याचे दिसताच निवडणुकीनंतर ही योजना बंद पडणार असल्याच्या वावड्या उठविल्या. जनहिताच्या योजनांविरुद्धचा त्यांचा आकस दिसून आल्याने मतदारांमध्ये नाराजी पसरली असल्याचीही माहिती आहे.
(हेही वाचा महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल; Raj Thackeray यांचा विश्वास)
जनहिताच्या योजनांना केवळ राजकारणापोटी विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरोधात नागरिकांनी उघड भूमिका घेतली आहे. त्यांची मते जनताच खोडून काढत आहे. आजवरच्या निवडणुकांमध्ये हे पहिल्यांदाच घडून येत आहे. ही योजना महाराष्ट्राची दिशा बदलणारी ठरत आहे. लोकसभेतील काँग्रेसने (Congress) पेरलेले नकारात्मक वातावरण दूर होऊन एक सकारात्मक वातावरणाची तयार झाले आहे. लाडकी बहीण योजनेवर प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने मोठी टीम बसविली. जनप्रतिसादापुढे या टीमलाही उत्तर सापडणे कठीण झाले. तर दुसरीकडे भाजपने ही योजना वाचविण्यासाठी, लाडक्या बहिणींना लाभ मिळवून देण्यासाठी कंबर कसली. काँग्रेसच्या ‘फेक नरेटिव्ह’ला जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपच्या आक्रमकतेपुढे काँग्रेस नेते गारद होऊन शांत झाले आहेत. तर लाडक्या बहिणी या योजनेवर भरभरून बोलू लागल्या आहेत. हा बदल या निवडणुकीचे चित्र आत्ताच स्पष्ट करणारे ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
‘लाडकी बहीण’मुळे बाजारात चैतन्य
‘लाडकी बहीण’चे पैसे मिळाल्यानंतर कुणी शिक्षणासाठी खर्च केले. कुणी भावाकडून भेट म्हणून साडी घेतली. कुणाला नवऱ्याला आता पैसे मागावे लागणार नसल्याचा आनंद आहे. बाजारात यंदाच्या दिवाळीत खरेदीसाठी अधिक गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी लाडकी बहीण योजनेचा परिणाम आहे. काँग्रेसकडून ही योजना बंद करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. निवडणुकीत हे षडयंत्र आम्ही आमच्या मतदानातून हाणून पाडू’, अशा शब्दांमध्ये लाडक्या बहिणींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यासोबतच ‘ जो आमचा विचार करतो त्यांचा आम्ही विचार करणार’, असेही सांगितले.
Join Our WhatsApp Community