आता भाजपचे मिशन ‘मराठा’! 

आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांचा आहे, असे केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा आरक्षणाचा चेंडू महा विकास आघाडीच्या पारड्यात पडला आहे. त्यामुळे भाजपने तयारी सुरु केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यापासून मह विकास आघाडी सरकारच्या विरोधात मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा समाज आता रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत आहे. त्या मराठा समाजाचे नेतृत्व करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासाठी भाजपचे मराठा समाजाचे नेते राज्यभर दौरा करणार आहेत. त्याची आखणीदेखील करण्यात आली आहे.

मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांनी याचे खापर भाजपवर फोडले, तसेच आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्राला आहे, असे सांगत केंद्रावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र  त्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांचा आहे, असे केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा आरक्षणाचा चेंडू महा विकास आघाडीच्या पारड्यात पडला आहे. त्यामुळे भाजपने तयारी सुरु केली आहे.

(हेही वाचा : संभाजी महाराजांची बदनामी केल्याबद्दल कुबेर यांच्या विरोधात तक्रार दाखल)

छत्रपती संभाजी राजे यांचा दौरा! 

मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर भाजपचे खासदार छत्रपती संभाजी यांनी राज्यभर दौरे काढून मराठा समाजाच्या भावना समजून घ्यायला सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपनेही आता पक्षातील मराठा नेत्यांना कामाला लावले आहे.

कोण जाणार दौऱ्यावर?

भाजपचे खासदार नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, नरेंद्र पाटील आदी नेते जिल्हावार दौरा करणार आहेत. प्रत्येक नेत्याला एक जिल्हा वाटून देण्यात आला आहे. त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाची सविस्तर भूमिका मांडण्याचे काम हे नेते करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here