भाजपच्या (BJP) वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी ‘भव्य मराठी दांडीया’चे (Marathi Dandiya) काळाचौकी येथील अभ्युदय नगर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती दि. २ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीचे (BJP)प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha), महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. दरवर्षी पाच दिवस चालणारा हा उपक्रम यावर्षी सात दिवस चालणार आहे. या ‘भव्य मराठी दांडीया’ चा आनंद घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी आमदार कोटेचा म्हणाले की, मुंबईतील पहिला मराठी दांडिया(Marathi Dandiya) भाजपाने(BJP) सुरू केला. या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून या मराठी दांडीयाला गेली दोन वर्षे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हिंदू संस्कृती जपणा-या प्रत्येकाला या मराठी दांडीया(Marathi Dandiya) साठी दरवर्षी नि:शुल्क प्रवेश देण्यात येतो. यंदा सात दिवस रोज मराठी पेहरावात उत्तम सादरीकरण करणाऱ्या एक महिला आणि एका पुरूषाला एक – एक आयफोन बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच गुणांकांमध्ये जर दोघांमध्ये बरोबरी झाल्यास त्या दोघांनाही एक – एक आयफोन देण्यात येईल,असे आ. कोटेचा यांनी सांगितले. या मराठी दांडीयासाठी नि:शुल्क प्रवेश पत्रिका आपले ओळख पत्र दाखवून मध्य आणि दक्षिण मुंबईतील भाजपाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध होतील, अशी माहितीही आ.कोटेचा यांनी दिली. मुंबईतील पहिला मराठी दांडिया (Marathi Dandiya)भाजपाने सुरू केला असताना याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत,असा टोलाही आ. कोटेचा यांनी विरोधकांना लगावला.
उल्हासपूर्ण वातावरणात भव्यदिव्य मराठी दांडीयाचा (Marathi Dandiya)आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे, असे आमंत्रण भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिले. चित्रपट,मालिका कलावंतांची उपस्थिती, वाद्यवृंदाचा ठेका आणि नेटके संयोजन असलेल्या या मराठी दांडीयाची रंगत न्यारी आहे असेही वाघ म्हणाल्या. अवधूत गुप्ते यांनीही मराठी दांडीयासाठी आमच्या वादकांचा हात आणि माझा गळा सज्ज आहे ,तेव्हा मराठी दांडियाच्या ठेक्यावर धमाल करण्यासाठी आणि आयफोन जिंकण्यासाठी सर्वांनी यावे,असे आवाहन गुप्ते यांनी केले.