
भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने प्रत्येक महिन्याला जनता दरबार (BJP’s Janata Darbar) आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार घेतील. या मालिकेतील पहिला जनता दरबार (BJP’s Janata Darbar) येत्या २२ एप्रिल २०२५ रोजी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. पक्षाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या दरबारात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. (BJP’s Janata Darbar)
प्रदेश भाजपने प्रत्येक महिन्याला एका मंत्र्याच्या जनता दरबाराचे आयोजन निश्चित केले आहे. या दरबारात नागरिक आणि कार्यकर्ते आपल्या भागातील समस्यांचे निवेदन थेट मंत्र्यांसमोर मांडू शकतील. पहिला जनता दरबार पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली २२ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ४:३० या वेळेत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. (BJP’s Janata Darbar)
या दरबारात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या भागातील संबंधित मंत्र्यांच्या खात्याशी निगडित अडचणींचे लेखी निवेदन दोन प्रतींसह आणण्यास सांगण्यात आले आहे. निवेदनाची एक प्रत सकाळी ११ वाजता प्रदेश कार्यालयात जमा करावी. तसेच, शक्य असल्यास कार्यकर्त्यांनी निवेदनाची आगाऊ प्रत [email protected] या ईमेल आयडीवर पाठवावी, जेणेकरून त्यावर तातडीने कार्यवाही करणे आणि संबंधित विभागाकडे निवेदन पाठविणे सोयीचे होईल, असे प्रदेश कार्यालयाने स्पष्ट केले आहे. (BJP’s Janata Darbar)
हेही वाचा- Central Railway च्या गौरवशाली इतिहासाची १७२ वर्ष पूर्ण; कार्यक्रम संपन्न
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले, “जनता दरबार हा पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी एक महत्त्वाचा व्यासपीठ आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती मिळेल आणि नागरिकांच्या समस्या थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचतील. कार्यकर्त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या भागातील प्रश्न मांडावेत आणि विकासकामांना चालना द्यावी.” (BJP’s Janata Darbar)
हेही वाचा- चौंडी विकास आराखड्याला गती द्या! सभापती Ram Shinde यांचे निर्देश; मंत्रिमंडळाची बैठकही होणार
या जनता दरबाराच्या माध्यमातून भाजपने जनतेशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडविण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. (BJP’s Janata Darbar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community