सज्ज झाले १२ शिलेदार; पुन्हा आणणार भाजप सरकार!

134

महाराष्ट्रात सध्याच्या राजकारणात गणिते बदलली आहेत. सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला भाजपपासून तोडून सत्ता मिळवली. म्हणून भाजपने आता स्वतःच्या ताकदीवरच राज्यात सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. तसा ठराव मुंबईत भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संमत झाला. मात्र त्याकरता भाजपने १२ शिलेदार निवडले आहेत, हे १२ शिलेदार राज्यात भाजपची सत्ता पुन्हा आणतील, असा विश्वास भाजपच्या पक्षश्रेष्ठींना वाटत आहे.

एकहाती सत्ता आणण्यासाठीची प्राथमिक योजना   

२०२४ साली होऊ घातलेली आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार भाजपने यापूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आता पावले टाकायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने २०२४ मध्ये एकहाती सत्ता आणण्यासाठीची प्राथमिक योजना निश्चित केली. भाजपच्या १२ प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी असेल.

(हेही वाचा दरेकरांच्या दारातूनच ‘आप’ने फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग)

भाजपचे नेते ३६ जिल्ह्यांचा दौरा करणार 

याशिवाय, १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत भाजपचे नेते महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. तर मुंबईतील प्रत्येक वॉर्डात भाजपकडून पोलखोल अभियान राबवले जाणार आहे. या सगळ्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय हवा चांगलीच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आम्ही एकदा धोका खाल्लाय, वारंवार खाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

१२ शिलेदार आणि जबाबदारी 

  • देवेंद्र फडणवीस – सोलापूर, अहमदनगर
  • सुधीर मुनगंटीवार – बीड, जालना
  • चंद्रकांत पाटील – ठाणे ग्रामीण, नाशिक
  • आशिष शेलार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • रावसाहेब दानवे – बुलढाणा, नंदुरबार
  • प्रवीण दरेकर – पालघर, मीरा भाईंदर
  • पंकजा मुंडे – कोल्हापूर, सांगली
  • चंद्रशेखर बावनकुळे – अकोला, अमरावती
  • गिरीश महाजन – उस्मानाबाद, हिंगोली
  • रवींद्र चव्हाण – सातारा, पुणे ग्रामीण
  • संभाजी पाटील – निलंगेकर – गोंदिया, भंडारा
  • संजय कुटे – दक्षिणी रायगड, उत्तर रायगड
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.