काँग्रेसची अमित साटम यांच्या विरोधात पोलीस तक्रार

111

मालाड पश्चिम येथील एका मैदानाला मुंबईचे पालकमंत्री व काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या मुद्दयावरून भाजपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आंदोलनावरून सुरु झालेल्या वादात काँग्रेसने उडी घेतली. उत्तर प्रदेशातील निवडणुका व मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानच्या नावाने भाजप धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात भाजपचे आमदार अमित साटम हे लोकांची दिशाभूल करण्याच्यादृष्टीकोनात खोटी माहिती पसरवत असल्याने काँग्रेसच्यावतीने त्यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस स्थानकात तक्रारही नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या टार्गेटवर अमित साटम यांनी स्पष्ट होत आहे.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार अमित साटम यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे व त्यांना अटक व्हायला पाहिजे,असे सांगितले. याप्रसंगी मुंबई मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील, मुंबई काँग्रेसचे लीगल सेलचे कार्याध्यक्ष रवी जाधव, अध्यक्ष तुषार कदम व लीगल सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – डोंगरीतील सामंतभाई नानजी मार्गाचेही सौंदर्यीकरण)

काय म्हटले भाई जगताप

भाजप आमदार अमित साटम व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची बदनामी केलेली असून सामाजिक शांतता दंगल भडकवण्याच्या उद्देशाने भंग केलेली आहे. त्याचबरोबर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल करून समाजमाध्यम व पोलीस ठाण्यात खोट्या माहितीचा प्रचार व प्रसार करण्याचा मोठा कट रचलेला आहे. या कटामध्ये अनेक लोक सामील आहेत. त्यात मुख्य भाजपचे आमदार अमित भास्कर साटम व त्यांचे इतर सहकारी यांनी भा.दं.वि.१८६० कलम १२०बी, १५३ए, २११, ४९९, ५०४, ५०५२(२) सह ३४ व इतर कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा केलेला आहे. या संदर्भात आम्ही भाजपचे आमदार अमित साटम यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. त्यावेळेस माझ्यासोबत मुंबई काँग्रेस लीगल सेलची संपूर्ण टीम उपस्थित होती असे जगताप यांनी म्हटले आहे.

या तक्रारीमध्ये अमित साटम व त्यांच्या सहकाऱ्यांवर परस्पर संगनमत करणे, कट रचून धार्मिक दोन गटांत दुश्मनी निर्माण करणे, खोटी तक्रार दाखल करणे, मानहानी करणे, जाणीवपूर्वक सामाजिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने खोट्या माहितीचा प्रचार व प्रसार करणे आणि दोन गटांत भांडणे होतील, तिरस्कार निर्माण व्हावा अशा पद्धतीने बोलणे, इत्यादी गुन्ह्यांसाठी ताबडतोब कारवाई करून अटक करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. अमित साटम यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची प्रत आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे, मुख्य नायाधीश मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांना सुद्धा पाठविण्यात आलेली आहे, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.