गेली तीन वर्षे मुंबई उपनगराचा कारभार बालकमंत्र्याच्या हाती होता. पण, सत्ताबदल झाल्यानंतर लोढा यांच्या रुपाने उपनगराला खरे पालकमंत्री मिळाले आहेत, अशी खरमरीत टीका भाजपा आमदार अमित साटम यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली.
( हेही वाचा : 7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होणार?)
साटम म्हणाले, मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई उपनगराच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून ते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहेत. सर्वसामान्य मुंबईकरांच्या समस्या जाणून घेत आहेत. ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या समस्यांचा निपटारा लावला आहे. त्यामुळे आम्हाला जसा पालकमंत्री अपेक्षित होता, तो तीन वर्षांनंतर लाभला आहे.
आधीचे ‘बालकमंत्री’ आणि आताच्या पालकमंत्र्यांमधील मुख्य फरक म्हणजे, ते रस्त्यावर उतरून, लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवत आहेत. काम करण्यावर त्यांचा भर आहे. चमकोगिरी आणि फुकटचे ज्ञान पाजळण्यात त्यांना अजिबात रस नाही, अशी टीकाही साटम यांनी केली.
Join Our WhatsApp Community