मुंबईतील भ्रष्ट कंत्राटदारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अभय मिळत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. मुंबईत भाजप वर्धापन दिन झाल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलत असताना आशिष शेलार यांनी हा गंभीर आरोप केला.
आशिष शेलार म्हणाले की, ‘मुंबई महापालिकेची असलेली अमदनी आणि मुंबईकरांना मिळणारी सेवा, यामधली गळती कुठे जातेय. ८० हजार कोटींच्या ठेवी आहेत, ५३ हजार कोटींचे बजेट आहे, १ करोड ४० लाखांची मुंबई आहे, मग मुंबईकरांना एवढ्या हजार कोटी रुपयांतून मिळणारी सेवा गळते कुठे? तर ती कंत्राटदाराच्या मुळाशी गळते, ज्या कंत्राटदारांना समर्थन हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या गटाचे आहे. म्हणून त्यांच्या विरोधाचा एल्गार म्हणजे महापालिका निवडणुकीचा प्रचार आहे.’
पुढे शेलार म्हणाले की, ‘आमचा वर्धापन दिवस हा लोकशाहीचा महोत्सव आहे. भारतीय जनता पक्ष सोडल्यावर अन्य सगळेच पक्ष हे कोणत्याही परिवाराची खासगी मालमत्ता किंवा खासगी कंपन्यासारखे वागतात. लोकशाही मुल्यांवर सगळ्यांसाठी खुला असलेला पक्ष हा भाजप आहे. कुठल्या परिवाराचा नाही, कुठल्या खासगी कंपनीचा नाही. जनतेचा हा पक्ष आहे. जनआशीर्वादाने इथेपर्यंत पोहोचला आहे. म्हणून मोदींच्या नेतृत्वात जे यश भाजपला मिळतंय. त्यामुळे हा महोत्सव केवळ वर्धापन दिनाचा न राहून हा लोक महोत्सव, लोकशाहीचा महोत्सव झालाय हे चित्र संपूर्ण मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये दिसतंय.’
(हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चात घोषणा देणाऱ्या दुर्गा भोसले-शिंदेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन)
Join Our WhatsApp Community