‘श्रद्धाचं आडनाव वालकर होतं म्हणून की तो आफताब होता म्हणून? तत्कालीन सरकार गप्प का होतं?’, शेलारांचा सवाल

श्रद्धा वालकर हत्याकांडात अनेक धक्कादायक खुलासे होत असताना, श्रद्धाने 2020 मध्ये पोलिसांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यावेळी जर का पोलिसांनी त्या पत्राची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई केली असती तर आज श्रद्धाचे प्राण वाचले असते, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले असतानाच आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः ‘श्रद्धाच्या पत्राची तेव्हाच दखल घेतली असती तर…’, फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश)

सरकार आणि पोलिस थंड का होते?

नराधम आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. इतक्या क्रूर पद्धतीने आफताबने श्रद्धाची हत्या केली. आता दोन वर्षांपूर्वी श्रद्धाने पोलिसांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. तिला ब्लॅकमेल केलं जात असून तिचे तुकडे-तुकडे करुन हत्या करण्याचा कट आफताबने आखला असल्याचे श्रद्धाने पोलिसांना 23 नोव्हेंबर 2020 रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. असं असताना महाराष्ट्राचं तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि पोलिस प्रशासन यावर थंड का होतं?, असा थेट सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

चौकशी व्हायला हवी

तिच्यावर होणा-या हल्ल्याची माहिती तिने पोलिसांना दिली असताना पोलिसांनी त्यावेळी कारवाई का केली नाही? श्रद्धाचं आडनाव वालकर होतं म्हणून की तो आफताब होता म्हणून?, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीचं समर्थन होतं म्हणून की या सगळ्यावर पांघरुण घालायचं होतं म्हणून?, या सगळ्याची संपूर्ण चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

पोलिसांच्या माध्यमातून हे पत्र दाबण्यात आलं का?, त्यावेळी पोलिसांवर कोणता दबाव होता का? तत्कालीन सकरकारमध्ये लागेबांधे असलेले पक्ष यांचा या प्रकरणात काही सहभाग होता का?, या सगळ्याची चौकशी आताच्या पोलिसांनी करावी, अशी मागणीही आशेष शेलार यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here