राज्य अराजकतेकडे… शेलारांचा ठाकरे सरकारवर आरोप

राज्यात राज्यकर्तेच अराजकता माजवत असल्याचे दुर्दैवी चित्र पहायला मिळत आहे.

राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाली असून राज्य अराजकतेकडे जात आहे. त्यामुळे पत्रकार, संपादक, ,बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमचे काम करत आहोतच, भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात दुर्दैवी चित्र

राज्यात गेल्या काही दिवसांत असेच दुर्दैवी चित्र आहे. समाज माध्यमांंवर जे बोलले त्यांना मारण्यात आले, एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यात आला, सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकांना घरात घुसून अटक करण्यात आली, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बोलणे दखलपात्र गुन्हा करुन त्यांना अटक करण्यात आली. दहशतवादी कारवाया राज्यात होतात त्याची माहिती पोलिसांकडे नाही. हे सर्व पाहिले की, राज्यकर्ते अराजकता माजवत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसते.

(हेही वाचाः सोमय्यांवरील कारवाईची निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी! भाजपाची मागणी )

जनता असहाय्य

कायदेशीर मार्गाने तक्रार करणाऱ्या नागरिकांना अटकाव केला जात आहे. किरीट सोमय्या यांना पोलिस ठाण्यात जाण्यास अटकाव करण्यात आला. तसेच करुणा शर्मा या पोलिस ठाण्यात जात असताना त्यांना रोखण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. लखोबा लोखंडे नावाने ट्विटर खाते चालवणाऱ्याला अटक करुन न्यायालयात आणल्यानंतर शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. हे पाहता राज्यातील जनता असहाय्य झाली असल्याचे समजते. न्याय कुणाकडे मागावा अशी स्थिती जनतेची आहे.

(हेही वाचाः सोमय्यांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा कट! दरेकरांचा आरोप)

‘मुख्यमंत्र्यांनी म्हणावं, मी बेजबाबदार…’

मुख्यमंत्री कोरोना काळात म्हणत होते की मी जबाबदार. पण आता मुख्यमंत्र्यांना गोष्टी माहिती नसल्याचं शिवसेनेचे नेते सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार अशी घोषणा द्यावी, असा खोचक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

(हेही वाचाः भाजपा नेत्यांचे ‘ब्लॅकमेल’ करण्याचे काम सुरू- नाना पटोले)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here