स्वतः छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा ‘फोकस’ इथे का वळत नाही? भाजपाचा खोचक सवाल

महाराष्ट्रात तर स्वतः मुख्यमंत्री छायाचित्रकार आहेत, पण या उपेक्षित घटकांकडे त्यांचा फोकस वळला नाही.

80

राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने शनिवारी आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वतः छायाचित्रकार असतानाही राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवर त्यांचा “फोकस” का नाही वळला ? असा सवाल करत, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्य शासनाने चित्रकार आणि शिल्पकारांना मदत करावी, अशी मागणी केली.

सरकारच्या मदतीची गरज

राज्यात सुमारे १० हजार चित्रकार, शिल्पकार दरवर्षी प्रदर्शन करुन आपली कला सादर करतात, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण कोरोना काळात गेल्या दीड वर्षात प्रदर्शने होऊ शकली नाहीत. आपल्या राज्याला, देशाला कलेच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या कलावंतांचा अशावेळी राज्य सरकारने संवेदनशीलपणे विचार करण्याची गरज होती. कर्नाटक, चंदिगड सारख्या राज्यांनी आपल्या राज्यातील कलावंतांना मदत केली. महाराष्ट्रात तर स्वतः मुख्यमंत्री छायाचित्रकार आहेत, पण या उपेक्षित घटकांकडे त्यांचा फोकस वळला नाही. याचीच आठवण करुन देण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली, असे शेलार यांनी सांगितले.

(हेही वाचाः राज्याच्या अधिकारांवर गदा आणाल तर खपवून घेणार नाही! मुख्यमंत्र्यांचा केंद्राला इशारा)

काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही

ज्याचा जावई गांजाडी म्हणून पकडला गेला, त्या मंत्र्याला लाथ मारुन मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे. अशा मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. दारू आणि गुत्याच्या वसुलीत अधिकारी लावले जातात, मग अधिकाऱ्यांना अटक झाल्यावर ते पोपटासारखे बोलू लागतात. बार आणि गुत्यांमधून वसुली कशी करायला लावली हे सांगतात. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे. देशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य सुरू आहे, महाराष्ट्रातही तेच अपेक्षित आहे. पण महाराष्ट्राचा नारा काही तरी वेगळा दिसतोय. ‘काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही’ असा काही नारा आहे का? स्वत: काही काम करायचे नाही, यंत्रणांना काम करू द्यायचे नाही. भ्रष्टाचाराविरोधात बोलायचे नाही, भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायचे नाहीत, गांजामध्ये अटक झालेल्यांवर कारवाई करायची नाही, महिलांवरील अत्याचाराबाबत बोलायचे नाही. हे सर्व प्रश्न मांडले तर महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची ढाल पुढे करायची. यातून मुख्यमंत्री तुम्ही स्वत:चं पाप लपवू शकत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.