‘मुंबईच्या शिव वड्याला बिर्याणीचा मसाला’, शेलारांची काँग्रेस आणि ठाकरे गटावर बोचरी टीका

103

सध्या राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका होत असतानाच आता शिंदे गटाचा मित्र पक्ष असलेल्या भाजपने देखील ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क भरण्यासाठी काँग्रेसकडून पेंग्विन सेनेला मदत करण्यात येत असल्याची टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

शिव वड्याला बिर्याणीचा मसाला

दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क भरणार नाही म्हणून पेंग्विन सेनेला शिवाजी पार्क भरण्यासाठी काँग्रेसचा हात बळ द्यायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुंबईतल्या शिव वड्याला बिर्यानीचा मसाला लावायचं काम हे दोन्ही पक्ष हातात हात घालून करत आहेत. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की या सगळ्यामध्ये आपला स्वार्थ साधण्याचं आणि ताकद वाढवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस गुपचुपपणे करत आहे, अशी टीका भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.

(हेही वाचाः धमकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया)

मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानाची पाहणी करत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी चाललेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच दसरा मेळावा हा दणक्यातच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.