मतलबाचे ‘पाणी’ इथेच मुरतेय! शेलारांची पालिकेवर टीका

141

भाजप नेते आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त सी.डी. जोशी यांना पत्र लिहीत मुंबईमध्ये होणारी पाण्याची चोरी आणि भूजलाचे अतिशोषण यासह अन्य समस्यांकडे लक्ष वेधले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणीही त्यांनी केली होती.

एकीकडे समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यापेक्षा पाण्याची चोरी आणि गळती थांबवूनच मुंबईकरांच्या पाण्याची गरज भागवता येईल, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट करत, अनेक वेळा पाणी चोरी प्रकरणावर लक्ष वेधूनही टँकर माफियांची लूट सुरूच असून मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर हा डल्ला मारण्याचा प्रकार आहे, असा आरोप करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

( हेही वाचा : शासन निर्णयाला आठ दिवस उलटले, तरी दुकानांवरील इंग्रजाळलेल्या पाट्या तशाच! )

मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला

पाणी चोरीच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेवर सडकून टीका केली आहे. मुंबईतील सुमारे १० हजारापेक्षा जास्त विहिरीतून बेकायदेशीरपणे २ हजार टँकर बेसुमार पाण्याचा उपसा करीत आहेत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. १० हजार कोटींची बेकायदेशीर उलाढाल सुरु आहे. दिवसाढवळ्या नैसर्गिक संपत्तीची लूट सुरु असल्याकडे केंद्रीय भूजल प्राधिकरणाने लक्ष वेधून याबाबत नियमावली तयार करा सांगितले. आम्ही सतत सांगतोय, पाण्याची गळती रोखा, चोरी थांबवा, टँकर माफियांना आळा घाला, पण एकिकडे ही लूट सुरुच आहे आणि दुसरीकडे १८ हजार कोटी खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मुंबईकरांवर लादला जात आहे. ८० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर हा डल्लाच असल्याचा आरोपही शेलारांनी केला आहे.

हेच का तुमचे पर्यावरण प्रेम?

टँकर माफीयांकडून होणाऱ्या २०० कोटींच्या दंड वसूलीला पालकमंत्र्यांनी स्थगिती देऊन पाण्याच्या १० हजार कोटीच्या लूटीला संरक्षण दिले. हेच का तुमचे पर्यावरण प्रेम? असा सवाल करत आशिष शेलारांनी करत १८ हजार कोटी खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करताना या पर्यावरण प्रेमाला सोईस्कर ओहोटी येते! मतलबाचे “पाणी”इथेच मुरतेय! अशी टीका केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.