दिल्ली आणि कोलकता येथे वादग्रस्त म्हणून बंदी घालण्यात आलेल्या BBC Documentary चे स्क्रिनिंग केल्यानंतर आता हे लोन मुंबईत पसरणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेत याचे स्क्रिनींग होणार आहे. त्याला आधीच भाजपने विरोध केला आहे. त्यासाठी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेलाही शिंगावर घेतले आहे. शरद पवारांनी आम्हाला सल्ला देत असताना केतकी चितळे प्रकरणात ही भूमिका का नाही घेतली? असा प्रश्न विचारला आहे.
मनसेला सुनावले
गुजरात दंगलीवर आधारीत असलेली BBC Documentary चे स्क्रिनिंग मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टिस) या संस्थेत करण्यात येणार आहे. त्यावरुन आता दिल्ली आणि कोलकाता नंतर मुंबईतही राजकारण तापले आहे. मनसेने बीबीसीच्या माहितीपटावर प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘लोकशाहीमध्ये कुणाचाही हक्क हिरावून घेता येत नाही.’ यावर उत्तर देताना शेलार म्हणाले, आम्ही कुणाचाही हक्क हिरावून घेत नाहीत. जे मनसेचे लोक आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. त्यांनी मनसेच्या विरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांना शिवाजी पार्कवर आणून खळ्ळखट्याक करा असे सांगितले होते.
मविआने मालाडच्या उद्यानाला दिलेले टिपू सुलतानाचे नाव काढण्याचे आदेश)
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या संस्थेत बीबीसीचा माहितीपट दाखविण्याचे काम विशिष्ट धर्माच्या संघटननेने केले असल्याची आमची माहिती आहे. हा विषय मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे कारण बनू शकतो, अशी भावना कार्यकर्ते आणि जनतेमध्ये आहे. म्हणून आम्ही पोलिसांना अवगत केले आहे, यावर वेळीच कारवाई करा. मोदींच्या बदनामीचा प्रयत्न मुद्दामहून केला जात आहे. भावना भडकविण्याचा प्रयत्न होत आहे, त्यावर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असेही आशिष शेलार म्हणाले.
Join Our WhatsApp Community