‘अशोक चव्हाणांची ‘ती’ क्लिप आम्ही व्हायरल केली तर ते अडचणीत येतील’, शेलारांचा इशारा

104

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात शिवसेना पक्षावरुन वाद सुरू असताना आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली असतानाच आता भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांना सूचक इशारा दिला आहे.

…तर ते अडचणीत येतील

अशोक चव्हाण यांची एक क्लिप जर आम्ही जाहीर केली तर त्यांची अडचण होईल. ते आमचे मित्र आहेत त्यामुळे आम्ही त्यांची अडचण करू पाहत नाही, असा थेट इशारा आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांना दिला आहे. तसेच काही राजकीय प्रथा,परंपरा असताता त्यामुळे त्यांचा आम्ही भंग करणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबाबत कोणतीही टीका करणार नाही पण त्यांच्या राजकीय घडामोडींबाबत नक्कीच बोलू शकतो, असेही शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

चव्हाणांचा गौप्यस्फोट

2014 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांसोबत माझी मुंबईतील कार्यालयात यासंदर्भात भेट झाली होती. त्यामुळे 2019 मध्ये सत्तेत आलेली महाविकास आघाडीची भूमिका ही फडणवीस मुख्यमंत्री असतानाच तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.