आता शिवसेनेचे हे ‘संजय’ भाजपच्या रडारवर… नितेश राणेंनी केला आक्रमक शैलीत प्रहार!

रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन शनिवारी रात्री झालेल्या चौकशी नाट्याने महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले जात आहे. त्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री व सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. आपल्याला कोविडचे जंतू सापडले असते, तर ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते, असे आक्षेपार्ह विधान संजय गायकवाड यांनी केल्याने त्यांच्यावर आता सर्वच स्तरावर टीका होऊ लागली आहे. यात भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या खास आक्रमक शैलीत गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हा प्रयोग आधी तुझ्या घरकोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर, अशा शब्दांत नितेश राणे यांनी गायकवाड आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.

काय आहे नितेश राणे यांचे ट्वीट?

संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानावर नितेश राणे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..
हे या गायकवाडला कोण सांगेल..
पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..
जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..
कुठे घालायची तिथे घाल.., असे आक्रमक ट्वीट यांनी संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी केले आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

राज्यात होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लसींच्या तुटवड्याबाबत संजय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देत केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील भाजप नेत्यांवर ताशेरे ओढले. राज्याला लस आणि औषधांचा पुरवठा करताना केंद्र सरकारकडून दुजाभाव केला जात आहे, असे संजय गायकवाड म्हणाले. पण आपल्या मनातील भाजप नेत्यांबद्दलचा तिरस्कार व्यक्त करताना, त्यांची जीभ घसरली आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केले. राजकारण करण्याची ही वेळ नाही असे सांगत त्यांनी भाजपला राजकारण थांबवण्याचे आवाहन केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here