लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष (BJP MLA) निवडणूकपूर्व सर्वेक्षण करीत असतो. त्या माध्यमातून जनतेचा कौल जाणून घेऊन पुढील रणनीती आखली जाते. त्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची मदत घेतली जाते, काही पक्षांकडे स्वतःची यंत्रणाही आहे. मात्र, केंद्रात सत्तेचे हॅट्ट्रिक साधू पाहणाऱ्या भाजपाने (BJP MLA) यावेळेस कोणत्याही संस्था, कंपन्यांवर विसंबून न राहता थेट आमदारांकडे निवडणूकपूर्व सर्वेक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यभरातील ३५० आमदारांची त्यासाठी निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ४० शिलेदारांचा त्यात समावेश आहे.
येत्या काळात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लोकसभेचे बिगुल वाजेल. त्यामुळे या निवडणुकांकडे लोकसभेआधीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. परिणामी, या राज्यांत स्वतःची सत्ता आणण्यासाठी भाजपा (BJP MLA) विशेष प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून जनतेचा कौल जाणून घेण्याची जबाबदारी आमदारांवर देण्यात आली आहे.
(हेही वाचा – DRDO Former Director : डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. अरुणाचलम यांचे निधन)
ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी इतर राज्यातील आमदारांकडून (BJP MLA) सर्वेक्षण केले जाणार आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणासाठी सर्व ३५० आमदारांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. त्यासाठी येत्या १८ तारखेला हे सर्व आमदार भोपाळमध्ये पोहचणार आहे. निवडणुकीत प्रचार यंत्रणा कशी राबवावी, भाजपाची रणनीती काय असेल, भाजपाची ताकद कमी असलेल्या भागांत कशाप्रकारे काम करावे, यासंदर्भातील मार्गदर्शनही या आमदारांना केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील ४० आमदार
निवडणूकपूर्व सर्वेक्षणाची जबाबदारी दिलेल्या ३५० आमदारांमध्ये (BJP MLA) महाराष्ट्रातील ४० जणांचा समावेश आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी इतर राज्यातील आमदारांकडून सर्वेक्षण केले जाईल. त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर पक्षाची पुढील रणनीती आखली जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community