भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि धमकीचा आरोप केल्यानंतर, त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता. पण ठाणे न्यायालयाकडून त्यांचा हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता नाईक यांना अटक होणे अटळ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
न्यायालयाकडून दिलासा नाही
गणेश नाईक यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलापूर आणि नेरुळ पोलिस स्थानकांत पीडितेकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नाईक यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा हा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे न्यायालयाकडून त्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता गणेश नाईक यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचाः राणा दाम्पत्याला दुसऱ्या दिवशीही दिलासा नाही, आता फैसला सोमवारी)
राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल
आमदार गणेश नाईक यांनी एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला अपत्य झाले. पण भाजप आमदार गणेश नाईक यांनी त्या अपत्याचा स्वीकार केला नाही. पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आयोगाने नवी मुंबई पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
(हेही वाचाः आता माझा पक्षाशी संबंध नाही, शर्मिला ठाकरेंनी राज ठाकरेंना असं का सांगितलं?)
Join Our WhatsApp Community