भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि धमकीचा आरोप होता. गणेश नाईक यांच्यावर गुन्हे दाखल असून बुधवारी झालेल्या सुनावणीत त्यांना दिलासा मिळालेला नाही. तर नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना अटक होणार की सुटका हे पहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा – मनसेची सभा होणारच! बाळा नादंगावरकर औरंगाबादमध्ये दाखल )
गणेश नाईक यांच्या वकीलांच्या आरोपानुसार नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला, असा आरोप करण्यात आला आहे. यावेळी राजकीय फायद्यासाठी नाईक यांच्याविरोधात खोट्या आरोपासह गुन्हा दाखल केल्याचा आरोप गणेश नाईकांचे वकील गुप्ते यांनी केला आहे. इतकेच नाही तर दोन वर्षापूर्वी पक्ष बदलल्याने नाईक यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही नाईकांच्या वकिलांनी केला आहे. या महिलेने गणेश नाईकांवर अत्याचाराचे आरोप केले होते, या प्रकरणानंतर महिला आयोगाने दखल घेतली आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात तपास वेगाने करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.