खडसे फडणवीसांना म्हणाले, ‘बसू आणि मिटवून टाकू’! महाजनांचा गौप्यस्फोट

170

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विळा भापळ्याचे नाते अनेकदा समोर आले आहे. तसेच जळगाव येथील भाजप आमदार गिरीश महाजन आणि खडसे हे देखील एकमेकांचे तगडे प्रतिस्पर्धी मानले जातात. दरम्यान, आता एकनाथ खडसे यांनी सगळं काही मिटवण्याची भाषा केल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे.

काय म्हणाले खडसे?

नाशिक येथील महानुभाव पंथाच्या कार्यक्रमात मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे मंचावर उपस्थित होतो. त्यावेळी खडसे हे देवेंद्र फडणवीस आणि माझ्याजवळ आले. त्यावेळी एकदा आपण बसू आणि मिटवून टाका,जाऊद्या असं ते आमच्याशी बोलत होते. पण त्यांना नेमकं काय मिटवायचं आहे हे आम्हाला काही माहीत नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांना धमकीचे प्रकरणः एकाला अटक,कोणी आणि का केला फोन?)

ते फडणवीस सांगतील

दरम्यान, आता मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे झाल्यावर आपण त्याबाबतीत बघू असे आम्ही त्यांना म्हटले. पण खडसे यांच्यासोबत बसून चर्चा करायची की नाही हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील मी त्याबाबत काहीही बोलू शकत नाही, असेही आमदार गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता खडसे आणि फडणवीस यांच्यात चर्चा होऊन सगळं काही मिटणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.