सध्या दाऊदचा हस्तक सलीम कुट्टावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आता याचा कुट्टावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि आमदार एकनाथ खडसे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
पुरावे नसतानाही आपल्यावर दाऊदच्या बायकोबरोबर संभाषण झाल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर माझी चौकशी करण्यात आली होती. आता फोटोच्या माध्यमातून गिरीश महाजनांचा सलीम कुट्टाशी संबंध दिसत आहे. देशद्रोहींशी गिरीश महाजनांचा सरळ संबंध आहे का? गिरीश महाजनांनी ((Girish Mahajan) मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत. ते पुराव्यानिशी समोर देखील येत आहेत. तेही वॉशिंगमशीनमधून स्वच्छ होऊन बाहेर येतात की काय, असा टोलाही खडसेंनी लगावला.
(हेही वाचा Maratha Reservation : भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये वाकयुद्ध सुरूच; बेवड्या, माकड, टकुऱ्या आणि बरेच काही)
काय म्हणाले गिरीश महाजन?
दाऊदचा आरोप झाल्याने खडसेंचा राजीनामा घेतला नाही. तर, पक्षात राहून चोऱ्या केल्या, आर्थिक घोटाळे केले म्हणून खडसेंना काढून टाकण्यात आले. एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत. भोसरी एमआयडीची प्रकरणात खडसेंच्या सगळ्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. ८४ एकरमधील सगळा मुरूमही खडसेंनी विकून टाकला आहे. याप्रकरणी एसआयटी नेमली असून, १३७ कोटींचा दंड खडसेंना झाला आहे. आता एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. त्यामुळे खडसेंना काय बोलावे-काय बोलू नये हे कळत नाही, असेही महाजन म्हणाले.
Join Our WhatsApp Community