सामंतांच्या गाडीवर हल्ला करणारे शिवसैनिक नाहीत तर राष्ट्रवादीचे लोक, पडळकरांचा आरोप

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या पुण्यातील दौ-यादरम्यान मंगळवारी एक धक्कादायक प्रकार घडला. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. यावरुन आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका होत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचे म्हटले आहे.

ठाकरेंचा दौरा राष्ट्रवादी-काँग्रेस पुरस्कृत

पुण्यातील आदित्य ठाकरे यांचा दौरा हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या कार्यकर्त्यांचा दौरा आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचा दौरा करतात पण त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अग्रेसर असतात. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गळ्याभोवती भगवे मफलर गुंडाळतात आणि शिवसेनेच्या नावे घोषणाबाजी करतात.

(हेही वाचाः राज्यपालांनी शिंदेंना का दिलं सत्तास्थापनेसाठी निमंत्रण? वकिलांनी केले स्पष्ट)

उदय सामंत यांच्या गाडीवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला त्याचा मी जाहीर निषेध करतो. पुण्यात फारसे शिवसैनिक नाहीत त्यामुळे सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारे लोक हे ब-यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. आदित्य ठाकरेंच्या सभेला शरद पवारांचा माणसं उपस्थित असतात, असा थेट आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

मविआवर टीका

तसेच, पडळकर यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला आहे. म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी काहीशी अवस्था आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची झाली आहे. त्यामुळे ते एकमेकांना सांभाळून घेत असल्याची टीकाही आमदार पडळकर यांनी केली आहे.

(हेही वाचाः निवडणूक आयोगाकडे जाण्यामागचा हेतू काय? न्यायालयाने केलेल्या प्रश्नांवर शिंदे गटाचा संपूर्ण युक्तिवाद)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here