‘मी दोन-अडीच वर्ष ठोकतोय, काय केलं यांनी मला?’, पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल

166

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून कायमंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घणाघाती टीका करण्यात येते. आता पडळकर यांनी थेट बारामतीतून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बारामती दौ-यावेळी गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे.

काय केलं यांनी मला?

बारामतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आता वेळ आली आहे आणि हे निश्चितच होणार आहे. हे काही फार अवघड नाही. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला वगैरे नाही, ही एक केवळ टेकडी आहे. राज्यात पवार कुटुंबीय खूप मोठे असल्याचे वातावरण तयार करण्यात आले आहे. पण हे कोणी मोठे नाहीत. मी गेली दोन-अडीच वर्ष यांना ठोकतोय काय केलं यांनी मला?, असा थेट सवाल गोपीचंद पडळकर यांनी बारामतीत केला आहे.

(हेही वाचाः शिवसेना कुणाची? घटनापिठाची होणार स्थापना, सरन्यायाधिशांचे आदेश)

2024 मध्ये बारामतीत भाजपला विजयी करा

2019 मध्ये विश्वासघातानं स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या अधिवेशनावेळी खासदार सुप्रिया सुळे या एखाद्या वरमाईप्रमाणे फिरत होत्या. दुस-याच्या वाट्याला आलेलं ओरबाडून घेण्यात पवार कुटुंबीयांना आनंद असतो. त्यामुळे आता 2024 मध्ये बारामतीत भाजपला सर्वाधिक मतांनी निवडून देऊन पवार कुटुंबीयांच्या वर्चस्वाला संपवायचे आहे, असे आवाहनही पडळकर यांनी यावेळी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.