सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? पडळकरांचा सवाल

काकांच्या मांडीवरुन उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव राऊतांना दिसत नाही.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कायमंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद काही नवा नाही. हा वाद आता पुन्हा एकदा पेटला असून, पडळकरांनी राऊतांवर थेट निशाणा साधला आहे. आपल्या आक्रमक शैलीत टीका करताना नेहमीप्रमाणेच पडळकरांनी राऊतांचा उल्लेख जनाब असा केला आहे.

आपल्या लेखातून भाजपाला हिंदुत्वाचे धडे देणारे राऊत उस्मानाबादेत झालेल्या भगव्याच्या अपमानाबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का, असा झणझणीत सवाल पडळकरांनी संजय राऊत आणि शिवसेनेला केला आहे.

(हेही वाचाः वानखेडेंवर आरोप करणारे नवाब मलिक एकटे पडले का?)

काय म्हणाले पडळकर ?

ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरुन उस्मानाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक होते. त्यावेळेसे उस्मानाबादचे धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय? असा आक्रमक सवाल पडळकरांनी केला आहे. महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपवण्यासाठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहिता. पण काकांच्या मांडीवरुन उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव राऊतांना दिसत नाही. तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री  स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट-सुलट वक्तव्य करतात, त्यावेळी सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? असे म्हणत पडळकरांनी उस्मानाबाद येथील घटनेवरुन संजय राऊत यांचे कान टोचले आहेत.

काय आहे प्रकरण?

विजय चौकात झेंडा लावण्यावरुन, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने उस्मानाबादमध्ये वाद निर्माण झाला होता. सोशल मिडीयावर औरंगजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहल्यामुळे, उस्मानाबादेत दंगे झाले. यामध्ये अनेक पोलिस देखील जखमी झाले. तरीही, या प्रकरणात राऊत यांनी कोणतेच भाष्य केले नाही, म्हणून पडळकर यांनी राऊतांना खडे बोल सुनावले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here