विधानभवनाच्या बाहेर विरोधक ५० खोकी आणि गद्दार या घोषणे च्या पुढे जात नाहीत, पण ज्यांनी १९७८ साली ज्यांनी गद्दारीची मुहूर्तमेढ उभारली त्यांनी आमच्यावर बोलू नये, अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत विरोधकांवर हल्लबोल केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९७८ साली काँग्रेसमधून आमदार फोडून पुलोदचा प्रयोग केला होता.
( हेही वाचा : २५ ऑगस्टपूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण करा; रवींद्र चव्हाण यांची सूचना)
सत्ता गेल्याचे विरोधकांनी समजून घ्यावे
अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांना मदत या विषयावरील विरोधकांच्या प्रस्तावावर आमदार पडळकर बोलत होते. जे ५० दिवसांपूर्वी सत्ताधारी होते आज ते विरोधक आहेत. त्यांनी सत्ताधारी असताना काय केले होते. विरोधक विधान भवनाच्या पायरीवर बसून आम्हाला गद्दार आणि ५० खोकी या घोषणेचा व्यतिरिक्त काही बोलत नाही. गरीब कुटुंबातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याची विरोधकांना पोटदुखी का होत आहे. शिंदे आणि फडणवीस हे राज्य चांगले सांभाळत आहेत, आता विरोधकांनी त्यांची सत्ता गेली आहे, हे समजून घेतले पाहिजे, असेही आमदार पडळकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community