आधी बैलगाडा शर्यत आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी पडळकर मैदानात

परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातला सचिन वाझे कोण? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

77

बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर वातावरण तापवणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आता तर एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरले असून, लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. येत्या २१ सप्टेंबरला झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आले असून, आपण तिथे जास्त संख्येनं यावे, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे.

(हेही वाचाः रडगाणे सुरुच… एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पुन्हा मिळणार ‘थांबा’?)

एसटी महामंडळातला सचिन वाझे कोण?

मोठ्या विश्वासाने महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने  प्रवास करतो. पण आपल्या त्यागानं व सेवेने एसटी महामंडळला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची वेळ यावी, ही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे. एकतर तुटपुंजा पगार त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे  वेतन करार अजून झाले नाहीत. महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्टीसाठी हजारो कोटींचे टेंडर काढून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जातात, पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत. हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय? परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातला सचिन वाझे कोण? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचाः वडेट्टीवारांची ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’! एमपीएससी परीक्षेवरून पडळकरांचा हल्लाबोल )

अन्यथा संघर्ष अटळ

या सर्व विरोधात ज्या युनियनने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. माझं सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की आपण कुठल्याही दबावाला न जुमानता आपल्या हक्कासाठी लढा उभारा, मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे. माझं राज्य सरकारडं मागणं आहे की जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे पडळकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.