आता अहमदनगरचेही नामांतर होणार ? ‘हे’ नाव देण्याची पडळकरांची फडणवीसांना विनंती

154

औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतरानंतर आता अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. हिंदू राजमाता, हिंदू संस्कृतीच्या जीर्णेाद्वारकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला. त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे, अशी विनंती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  केली आहे.

पडळकरांचे फडणवीस यांना पत्र

गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरे लुटली आणि तोडली जात होती. त्यावेळेस अहिल्यामातेने या हिंदूसंस्कृतीत प्राण फुंकले. त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक पाट बांधले, बारव बांधले, मंदिरांचे पुनर्निर्माण केले. त्यांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.

( हेही वाचा: शिंदे गटाकडून पुन्हा एकदा नव्या नियुक्त्या जाहीर )

…म्हणून अहिल्यादेवींचे नाव द्या

आज जे काही या देशातले सांस्कृतीक वैभव टिकून आहे, त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा वाटा आणि वारसा आहे. त्यांची कर्मभूमी अखंड हिंदुस्थान आहे. पंरतु त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करुन देताना, निजामशाही इतिहास डोकावता कामा नये. तर या हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे. त्यामुळे आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतराचा निर्णय तातडीने घ्यावा ही विनंती, अशी मागणी पडळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.