“पक्षाचा आदेश पाळणं हे आमच्या रक्तात भिनलेलं”, भाजप आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी रवाना

गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या भाजपच्या पुण्यातील कसबा येथील आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानसभेत देखील भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा – राष्ट्रवादीच्या ‘त्या’ ३ आमदारांमुळे धाकधूक वाढली; अद्याप मुंबईत पोहोचलेच नाहीत!)

सर्व पक्षांनी सावध भूमिका घेत आपले आमदार फुटू नये म्हणून काळजी घेतली आहे. दरम्यान, पक्षाला आपली गरज असल्याने मी मतदानासाठी जात असल्याचे मुक्ता टिळक यांनी सांगितले आहे. सकाळी साडे सहा वाजता पुण्यातील टिळक वाड्यातून मुक्ता टिळक मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांनी असेही म्हटले की, पक्षाने दिलेला आदेश पाळणं हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे.

पक्षाचा आदेश पाळणं हे आमच्या रक्तात भिनलेलं

विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, सर्वच पक्षांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा आहे हे आधीपासून आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळण्यासाठी मी मुंबईकडे जात असल्याचे मुक्ता टिळक यांनी सांगितले.

राज्यसभेसाठीही केले होते मतदान

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुक्ता टिळक आजारी आहेत. राज्यसभा निवडणुकी वेळीही मुक्ता टिळक या मुंबईला मतदानासाठी गेल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचा विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता. तर, खासदार अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी देखील आपला विजय या दोघांना समर्पित केल्याचे पाहायला मिळाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here