मराठी माणसावर कब्जा करण्याचे स्वप्न पाहतच औरंगजेब गाढला गेला, परागंदा झाला. तेच औरंगजेबी अपूर्ण स्वप्न आज पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतली आहे काय, असा कडवा सवाल भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
( हेही वाचा : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या प्रचार कमिटीमध्ये होता १९ वर्षीय भारतीय मुलगा; हा प्रज्वल पांडे आहे तरी कोण? )
मुंबई भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेलार म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नवीन मतांसाठी केली जाणारी राजकीय बेगमी आणि मुंबईकरांमध्ये भ्रम पसरवविण्यासाठी केलेला प्रयत्न, मराठी तरुणांची माथी भडकविण्याचे जे उद्योग सुरू आहेत, त्याला योग्य वेळी आळा घालावा लागेल. ते आमचे कर्तव्य मानून मुंबईभर “भाजपा जागर मुंबईचा” ही यात्रा आम्ही करणार आहोत, असेही शेलार यांनी जाहीर केले.
प्रत्येक राजकीय पक्षाला आपले ध्येय धोरण, कार्यक्रम मांडण्याचे स्वातंत्र आहे, आम्ही ते मान्यही करतो. पण एखाद्या राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणामुळे उद्या काही राजकीय प्रश्न निर्माण होणार असतील, तर दुसरा राजकीय पक्ष म्हणून त्याकडे वेळीच जनतेचे लक्ष वेधले पाहिजे. त्यातील धोके जनतेच्या लक्षात आणून दिले पाहिजेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी मुस्लीम संघटनेचा पाठींबा, अशी बातमी २२ आक्टोबरला सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये काही लोकांचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आले. कुणी कुणाला समर्थन द्यावे, अथवा कुणी कुणाचे समर्थन घ्यावे, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण या घटनेकडे नीट पाहिले, तर असे लक्षात येते की, स्व:च्या राजकीय स्वार्थासाठी, मतांची पेरणी करण्याचा एक नवीन विचार हळुवारपणे या गटाने केल्याचा आरोपही शेलार यांनी केला.
मतदारांची दिशाभूल
या समर्थनामध्ये लांगूलचालणाचा राजकीय स्वार्थी वास आहे. एक नेरेटिव सेट करण्यासाठी आणि येणारी मुंबई महापालिका निवडणुकीत मतांच्या बेगमीसाठी केलेली ही पेरणी आहे. खरं तर त्यांना म्हणायचं होते “मराठी आणि मुस्लीम”, पण राजकीय हुशारीने आणि थेट बोलायची हिंमत नसल्याने “मराठी मुस्लीम” असा शब्द वापरला गेला.
त्यावर लगेच काही माजी संपादकांनी मुलाखती दिल्या. तोही त्यांचा अधिकार आहे. हे सगळे आजी-माझी संपादक आपआपले शो करुन मुंबई महापालिकेच्या जागा, तसेच अंधेरीची पोटनिवडणुक येथील मतांची टक्केवारी मांडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय कसा होणार, याची गणिते मांडू लागले आहेत.
म्हणून हे गणित जे मांडले जात आहे त्यातील काही प्रश्न आम्ही मुंबईकरांसमोर मांडत आहोत. हा सगळा प्रयत्न मराठी मतांना फसवणे आणि मुस्लीम मतांना भूलवण्याचे काम केले जातेय, असा आरोप शेलार यांनी केला.
मग मराठी जैनांना विरोध का?
उद्धवजी, तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करून वैचारिक लोच्या केला आहेच, त्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीत एक पाऊल पुढे टाकून तुम्ही लाल बावट्यासोबत युती केलीत. आता मुंबई महापालिका निवडणुकीत तुमचा परभव समोर दिसायला लागल्यावर समाजा समाजामध्ये विभागण्या का करू लागला आहात? धर्म आणि जात याची पेरणी का करताय ?
भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, “ना जात पर, ना धर्म पर, किये हुए विकास के काम पर आम्ही मते मागतो. तुम्ही मराठी मुस्लीम, अशी मांडणी करताय. मग मराठी जैनांना तुमचा विरोध का?, मराठी गुजराती तुम्हाला का चालत नाहीत?, मराठी उत्तर भारतीय का चालत नाही, मराठी हिंदू या विषयापासून तुम्ही फारकत का घेताय, हा आमचा थेट सवाल आहे, असेही शेलार म्हणाले.
Join Our WhatsApp Community