सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे एक नवा वाद उसळला आहे. यावरुन विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पण हा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ शकत नाहीत, असे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वतःच सांगितले असल्याचे पुरावे भाजप आमदार नितेश राणे यांनी सादर केले आहेत.
ठाकरे-देसाईंचा आरोप
वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा हा प्रकल्प तब्बल 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा असून यामुळे राज्यात एक लाखांपेक्षा जास्त जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाल्याचा आरोप सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
(हेही वाचाः वेदांता-फॉक्सकॉनवरील वादावरुन मोदींचा शिंदेंना फोन, म्हणाले…)
नितेश राणेंचे ट्वीट
पण आता याबाबत आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत 2020 सालच्या बातम्यांचा संदर्भ दिला आहे. ज्यामध्ये सुभाष देसाई यांनीच हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारणे शक्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्रापुढे आधी कबुली आणि मग भूलथापा…ही आहे ‘फसवी’ आदित्य सेना…ये पब्लिक है सब जानती है…, अशा शब्दांत राणेंनी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाईंवर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्रापुढे आधी कबूली मग भूलथापा..
ही आहे ‘फसवी ‘ अदित्य सेना..
ये पब्लिक है सब जानती है.. pic.twitter.com/Wf6R71sMkj— nitesh rane (@NiteshNRane) September 14, 2022