मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळा प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी या गौप्यस्फोटावर बोलताना आदित्य ठाकरेंना एक खुले आव्हान दिले आहे.
नक्की काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किती लोकांसमोर रडले? किती लोकांसमोर पाया पडले? कितीदा दिल्लीला जाऊन यासाठी आम्ही युती करायला तयार आहोत, हे ही त्यांनी स्वतः सांगितले आहे. या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. म्हणून जर मी खोट बोलत असेल, अन्य आरोप करणारे खोट बोलत असतील, सगळे पुरावे खोटे असतील, तर आदित्य ठाकरेंनी नार्को टेस्ट करावी, असे माझे खुले आव्हान आहे. तो बाळासाहेब ठाकरेंचा नातू असेल तर.’
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
‘एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील,’ असा आदित्य ठाकरेंनी गौप्यस्फोट केला होता.
(हेही वाचा – एकनाथ शिंदेंसारखा प्रयोग राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर; संजय राऊतांचा आरोप)
Join Our WhatsApp Community