राणे म्हणतात… ‘आता फक्त इसिसचा प्रस्ताव येणं बाकी आहे’

170

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्यानंतर, राज्यात राजकीय वादळ उठलं आहे. या युतीबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, भाजप नेत्यांनी मात्र शिवसेनेविरोधात पुन्हा एकदा टीकेचा सूर आळवला आहे.

आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत शिवसेनेवर टीका करणा-या भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. कट्टरपंथींना सुद्धा शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणं बाकी आहे, असे ट्वीट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

(हेही वाचाः सुप्रिया ताईंचा आनंदच न्यारा)

काय आहे राणेंचं ट्वीट?

वाह.. आता एमआयएमने महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी दर्शवली आहे.
कट्टरपंथींना सुद्धा शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणं बाकी आहे. खरंच, करून दाखवलं!!, असं खोचक ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः आधी सिद्ध करा, मगच महाविकास आघाडीत या! असे कोणाला म्हणाले जयंत पाटील?)

फडणवीसांचीही टीका

एमआयएमचे खासदार जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे यांना युपीची ऑफर दिल्याचता गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या शिवसेनेसोबत राज्याच्या सत्तेत असल्यामुळे, यावरुन आता भाजपने शिवसेनेला टार्गेट केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना आता सत्तेसाठी काय करते, तेच आम्हाला पहायचे आहे. तसंही शिवसेनेने आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारले आहे. त्यांच्याकडून अजानच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे, त्यामुळे त्याचा आता काय परिणाम होतो ते बघूया, असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला.

(हेही वाचाः आता सत्तेसाठी शिवसेना एमआयएम सोबत जाणार? फडणवीस म्हणतात…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.