भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का? नितेश राणेंचा मुश्रीफांवर हल्लाबोल

182

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यासंबंधित कोल्हापूर आणि पुण्यातील काही ठिकाणी आज सकाळी ६ वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू आहे. ही छापेमारी साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी झाली असून आता याप्रकरणात ईडीचं पुढचं पाऊल काय असेल? हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण यादरम्यान भाजपचे आमदार नितेश राणेंनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का? ईडीची कारवाई सुरू असतानाचं का आठवतो? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, “काही झालं नसेल, काही केलं नसेल, किंवा भ्रष्टाचार झाला नसेल तर घाबरण्याची काय गरज आहे? एवढा थयथयाट करण्याची काय गरज आहे. यांनी कितीही भ्रष्टाचार करायचा आणि कितीही चोऱ्यामाऱ्या करायच्या, यांनी कितीही आमच्या महापुरुषांना अपमानास्पद बोलायचं, अपशब्द वापरायचे. मग दिलगिरी व्यक्त केली की, महाराष्ट्राने स्वीकारायचं. भ्रष्टाचार झाला तर यांना टार्गेट केलं जात. मग यांची जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती. तेव्हा आमची घर तोडली, आमच्यावर चुकीच्या, खोट्या केसेस टाकल्या, अटक केले. आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केले.”

पुढे नितेश राणे म्हणाले की, “ईडी असो, सीबीआय असो, एनआयए असो किंवा इन्कम टॅक्स असो हे कुठलंही जाती, धर्म बघून कधीही कोणावर कारवाई करत नाही किंवा तपास करत नाही. पण भ्रष्टाचार करत असताना तेव्हा धर्म आठवला नाही का? तेव्हा या सर्व गोष्टी बोलाव्यासा वाटत नाही का? तुम्हाला विशिष्ट धर्म म्हणजे कुठला धर्म बोलायचा आहे? एवढ्या अतिरेक्या कारवाई होतात, चुकीची काम होतात, मटका, जुगार वगैरै हे सर्व होत. त्याच एका धर्मावर बोटं का लोकं उचलतात. हल्ली पण मुंबईवर बॉंम्ब ब्लास्ट करण्याचे जे काही सुत्र भेटले ते पण एकाच धर्माचे का भेटतात? मग चोऱ्यामाऱ्या आणि अतिरेकी कारवाई करताना विचार करावाना.”

(हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा नेता ईडीच्या रडावर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.