आता राणेंची राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

84

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि नंतर झालेल्या सुटकेनंतर राज्यात राजकारण अधिकच तापले असून, भाजप आता अधिकच आक्रमक झाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी तर आता राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग असल्याचे ट्वीट केले आहे.

काय आहे नितेश राणेंचे ट्वीट?

नितेश राणे यांनी युवा सेनेचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्वीट करत या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. नारायण राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर संध्याकाळी युवा सेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. हाच धागा पकडत नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्याची सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे. पण ते तर गुंडांचा सत्कार करताना दिसत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. त्यामुळे या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः शिवसेनेच्या आंदोलनामुळे राज्याला झाले ‘हे’ फायदे… मनसेने दिली यादी)

नारायण राणे काय बोलणार?

मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजूर झाल्यानंतर नारायण राणे यांची पुढची भूमिका काय असेल, ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी संध्याकाळी नारायण राणे पत्रकार परिषद घेणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.