मंत्र्यांनी गांधींऐवजी दाऊदच्या फोटोपुढे नतमस्तक व्हावं! राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

त्याचं एक स्मारक बांधून त्याला राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण द्यावं, अशी झणझणीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.

157

ठाकरे सरकारवर आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत जोरदार प्रहार करणारे राणे बंधू आता पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राणे बंधूंनी केल्याची तक्रार करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पण नितेश राणे यांनी मात्र याबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे.

नवाब मलिक हे दाऊदला मदत करत असल्याचे पुरावे असताना त्यांचा आजही राजीनामा घेतला जात नाही. मग हे सरकार काय दाऊदचं आहे का? मग मंत्र्यांनी आपल्या केबिनमध्ये गांधींचे फोटो काढून तिथे दाऊदचे फोटो लावावेत आणि त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

(हेही वाचाः कितीही गुन्हे दाखल केले तरी, ‘पवार साहेब हे…’ राणेंच्या ट्वीटमुळे पुन्हा खळबळ)

दाऊदला महाराष्ट्र भूषण द्या

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तडकफडकीने अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला. पण दाऊदसारख्या दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाबाबतचे सर्व पुरावे हे नवाब मलिक यांच्या बाजूने असताना त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही?, हे सरकार काय दाऊदचं सरकार आहे का? मग इतकं असेल तर मंत्र्यांनी आपल्या केबिनमध्ये गांधींचे फोटो काढून दाऊदचे फोटो लावावेत, त्याच्या फोटोपुढे नतमस्तक होऊन रहावं, त्याचं एक स्मारक बांधून त्याला राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण द्यावं, अशी झणझणीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.

हिंदूंवर अन्याय होऊ देणार नाही

आम्ही केवळ हिंदूंची बाजू घेतली आहे. नवाब मलिक हे मुस्लिम कार्यकर्ता आहेत असा प्रश्न जेव्हा शरद पवार यांनी उपस्थित केला तेव्हा आम्ही एवढंच बोललो, की अनिल देशमुख यांचा राजीनामा ते हिंदू आहेत म्हणून घेतला आहे का?, मग यात आम्ही दंगल कुठे भडकवली? आम्ही हिंदू म्हणून आमची भूमिका मांडली आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही कुठल्याही हिंदूवर अन्याय होऊ देणार नाही. हिंदुत्वाची बाजू घेणं ही जर चूक असेल तर आम्ही शंभर वेळा चूका करू, असे म्हणत राणेंनी आपली भूमिका मांडली.

(हेही वाचाः राणे बंधू ‘त्या’ वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत, गुन्हा दाखल!)

राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नितेश आणि निलेश राणे यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राणे बंधुंनी जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. तसेच शरद पवार यांचे दाऊदसोबत थेट संबंध असल्याचं वक्तव्य करुन त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे या तक्रारीत चव्हाण यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.