नारायण राणे यांना भाजपाने केंद्रीय मंत्रीपद देऊन कोकणातील भाजपाची ताकद वाढवली आहे, असे कायमंच बोलले जात आहे. पण राणे केंद्रीय मंत्री झाले तरी कोकणातील शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. असे विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले. याला चोख प्रत्त्युत्तर भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. सामंतांनी कोकणात शिवसेना आणि शिवसैनिकाला रसातळाला नेले, असे विधान राणे यांनी केले आहे.
शिवसेनेला काही फरक पडत नाही
माझ्या रत्नागिरी मतदारसंघामध्ये पंचायत समितीचे 20 सदस्य आहेत त्यापैकी 18 शिवसेनेचे आहेत. नगरपालिकेत 30 सदस्य असून, त्यापैकी 26 शिवसेनेचे असून केवळ 4 सदस्य भाजपाचे आहेत. कोण मंत्री झालं, कोणी पंतप्रधान झालं तरी शिवसेनेवर कोकणात काही परिणाम होणार नाही. आहे त्यापेक्षा मोठ्या ताकदीने शिवसेना कोकणात उभी राहील. आणि येणा-या नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांवर शिवसेना आपला झेंडा नक्कीच फडकवेल, असे उदय सामंत म्हणाले.
(हेही वाचाः राज्यपाल महोदय… ‘या’ प्रस्तावावर सही कधी करणार? सामनातून पुन्हा सवाल)
सामंतांचा शिवसेनेला फायदा झाला का?
हे ठरवणारे कोकणाचे शक्ती कपूर कोण?, कुठल्या आधारावर त्यांनी हे विश्लेषण केले आहे, असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उदय सामंत यांच्या मंत्रीपदाचा फायदा शिवसेनेला तरी झाला का?, का फक्त सामंत कुटुंबालाच फायदा झाला? याचं उत्तर सामंतांनी द्यावं, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिवसेना आणि सामान्य शिवसैनिकाला रसातळाला नेण्याचं काम उदय सामंत यांनी केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community