उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवालांच्या भेटीवर नितेश राणेंची टीका; म्हणाले, आता खलिस्तानवाद्यांचे समर्थन

194

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांनी ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी रात्री मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान देशातील अनेक समस्यांवर, तसेच देशपातळीवर भाजपविरोधात विरोधकांची आघाडी उभारण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण आता उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवालांच्या भेटीवर टीका होत आहे. भाजप नेते, आमदार नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘आधी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले. आता खलिस्तानवाद्यांचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात. यावरून हेच सिद्ध होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो पण आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही.’

शुक्रवारी रात्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासोबत संजय सिंह, राघव चढ्ढा आणि आम आदमी पक्षाचे नेते आले होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘अरविंद केजरीवाल माझ्या भेटीसाठी का आले आहेत, हे वेगळे सांगायची गरज नाही. देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने संपर्क केला जात आहे. देशाला मजबूत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज सगळेजण बोलून दाखवत आहे. भविष्यात त्यादिशेने पावले पडलेली दिसतील.’ तसेच यावेळी केजरीवाल यांनी कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

(हेही वाचा – एकनाथ शिंदे सुरतला निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला संपर्क केलेला; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.