हा तर दैनिक बाबर… अग्रलेखावरुन राणेंचा शिवसेनेशी ‘सामना’

शिवसेना आणि सामना गोल टोपीच्या प्रेमात इतके आहारी गेले आहेत की त्यांना समस्त हिंदू धर्माचा अपमानही दिसत नाही.

महिलांच्या सुरक्षेवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात यांच्यात लेटर वॉर रंगल्यानंतर, या वादाचा पुढचा अध्याय गुरुवारच्या सामन्यातील अग्रलेखातून पहायला मिळाला. सामनातील अग्रलेखातून राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे आणि शिवसेना खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यात जंगी सामना रंगल्याचे पहायला मिळत आहे. सामनाचा दैनिक बाबर असा उल्लेख करत संजय राऊत यांनी लिहिलेल्या अग्रलेखावर नितेश राणे यांनी जळजळीत टीका केली आहे.

हिंदू धर्माचा अपमान करणारे मुखपत्र

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरंही पेट घेतील असे सामनातील अग्रलेखातून म्हटल्यानंतर त्यावर नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. सामना म्हणजे हिंदू धर्माचा अपमान करणारे मुखपत्र झाले आहे. सामनाच्या अग्रलेखात राज्याच्या राज्यपालांचा अपमान करण्यात आला. प्रामुख्याने हिंदू धर्माचे प्रतिक त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि वारक-यांचे प्रतिक म्हणजे धोतर आहे. त्याच धोतराचा अपमान सामनाच्या अग्रलेखातून झाल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

(हेही वाचाः महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील! सामनातून थेट इशारा)

शिवसेना आणि सामना गोल टोपीच्या आहारी 

शिवसेना आणि सामना गोल टोपीच्या प्रेमात इतके आहारी गेले आहेत की त्यांना समस्त हिंदू धर्माचा अपमानही दिसत नाही, असा आरोप राणे यांनी केला आहे. अग्रलेखातून तुम्ही भाजपाच्या महिला नेत्यांचं मनोबल कमी करू शकत नाही, कारण त्या जिजाऊंच्या लेकी आहेत. एक आई आपल्या मुलाला न्याय देण्यासाठी किती टोकाला जाऊ शकते हे येत्या काही दिवसांत संजय राऊत यांना कळेल.

(हेही वाचाः राज्यपाल निभावतात मदमस्त हत्तींचा ‘रोल’! सामनातून घणाघात)

राऊतांनी माफी मागावी नाहीतर…

त्यामुळे संजय राऊत यांनी समस्त हिंदू धर्माची माफी मागावी नाहीतर हिंदू धर्म टोकाचे पाऊल उचलेल याचा प्रत्यय त्यांना येत्या काही दिवसांतच येईल, असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

(हेही वाचाः इतर राज्यांतील भाजपा महिला महामंडळास लढण्याचे बळ द्या)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here