माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या आरेमध्ये कारशेड उभारण्याच्या निर्णयाला ब्रेक लावत आरे कारशेड कांजुरमार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेतला. पण ठाकरे सरकार कोसळताच नवीन शिंदे-भाजप सरकारने पुन्हा एकदा आरेत कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला पर्यावरणवादी आणि शिवसेनेकडून विरोध करण्यात येत आहे.
‘आरे वाचवा’ आंदोलनातील आंदोलकांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. या आंदोलनात लहान मुलांचा वापर केल्याचा दावा करत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत. यावरुनच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.
नितेश राणे यांचे ट्वीट
‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा वापर झाल्याची तक्रार सह्याद्री राइट फोरमने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे केली आहे. या तक्रारीबाबत खरमरीत ट्वीट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ‘जी व्यक्ती स्वतः लहान आहे, अशा व्यक्तीविरोधात राष्ट्रीय बाल हक्क आयोग अशाप्रकारे नोटीस कशी काय बजावू शकतात, हा मोठा अन्याय आहे. बच्चे की जान लोगे क्या…’, अशा खोचक शब्दांत ट्वीट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Join Our WhatsApp CommunityHow can the national commission for protection of children rights send notice regarding someone who is still a CHILD!
Such injustice is not acceptedBache ki Jaan loge kya !! 😂 pic.twitter.com/4EV1OlxiwH
— nitesh rane (@NiteshNRane) July 11, 2022