आदित्य सेनेच्या ‘टक्केवारी’मुळेच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार; नितेश राणेंचा हल्लाबोल

172

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे आदित्य सेनेने ‘मुंबई महाष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार’, अशा उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. परंतु, यांच्या ‘टक्केवारी’च्या राजकारणामुळेच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आहे, असा हल्लाबोल भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी केला.

(हेही वाचा – “…तर महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील”, ‘या’ मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सरकारला इशारा)

यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. नितेश राणे लिहितात, निवडणुका जवळ आल्यामुळे आदित्य सेनेने आरोप सुरू केले आहेत. परंतु यांच्या जवळच्या आणि टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकांमुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे.

lettter

पुनर्विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एस.आर.ए. मधील झोपडपट्टी धारक खासगी विकासकाची नेमणूक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पामध्ये विकासक एक ते दीड वर्षाचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात. परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पामध्ये विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे, असे राणे यांनी पात्रात म्हटले आहे.

अशी होते फसवणूक…

एका बाजूला कोरोनामुळे मराठी बांधवाची रोजीरोटी गेली आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा-सात तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. मूळ घर विकासकाने अडवून ठेवले आणि भाडे मिळत नसल्यामुळे मुंबई बाहेर जाण्यावाचून गत्यंतर नाही. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना घराचा ताबा मिळतोय, ना हक्काचे भाडे. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वस्तात विकून मोकळे होतात, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे.

कठोर कारवाई करा!

अशा प्रकरणांमध्ये सरकारच्यावतीने ठोस पाऊल उचलून जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.