उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे शेतक-यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकार निर्दयी असल्याची टीका देखील केली. पण त्यांच्या याच दौ-याची आता भाजपने खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी अखेर उद्धव ठाकरेंना शेतक-यांच्या बांधावर पाठवलंच, असा खोचक टोला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मुख्यमंत्री असताना केलेली मदत जाहीर करा
माजी मुख्यमंत्र्यांनी केलेला हा दौरा अतिशय गतिमान होता. या इतक्या थोड्या वेळात त्यांनी नुकसानाची काय पाहणी केली हे कळत नाही. आता विरोधात असताना ते सरकारकडे शेतक-यांसाठी मागणी करत आहेत. पण जेव्हा स्वतः मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी शेतक-यांच्या मागण्या का पूर्ण केल्या नाहीत. मुख्यमंत्री असताना शेतक-यांना किती मदत केली, हे जाहीर करावं, असं आवाहन प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.
(हेही वाचाः बांधाची पाहणी करणं म्हणजे रस्त्यावर उभं राहून मुलाखत देणं नाही, नवनीत राणांचा ठाकरेंवर निशाणा)
मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
तसेच या दौ-यासाठी का होईना उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडले. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खरंच अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी उद्धव ठाकरेंना शेतक-यांच्या बांधावर पाठवलंच, अशी टीकाही प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
Join Our WhatsApp Community