मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी दरेकर ‘पुन्हा आले’! महाविकास आघाडीला धक्का

125

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर एकीकडे शिवसेनेला खिंडार पडलेले असताना महाविकास आघाडीला सातत्याने हादरे बसत असल्याचे पहायला मिळत आहे. बहुचर्चित अशा मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे एकप्रकारे आता मुंबई बँकेतही सत्तांतर झाले असून, महाविकास आघाडीसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

सहा महिन्यांत पुन्हा आले

प्रवीण दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडी सरकारने मुंबई बँकेची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे दरेकर यांनी मुंबई बँकेचे अध्यक्षपद मिळवल्याचा आरोप करत दरेकर यांना याआधी झालेल्या निवडणुकीत बाहेर ठेवण्यात आले होते. पण केवळ सहा महिन्यांच्या आत दरेकर यांनी पुन्हा एकदा मुंबई बँकेचे अध्यक्षपद आपल्या ताब्यात घेतले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्धार्थ कांबळे यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मुंबई बँक ही सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक मानली जाते.

(हेही वाचाः घटनात्मक पेचाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली ज्येष्ठ वकील निकम यांची भेट)

कांबळेंचा राजीनामा

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या मुंबई बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सिद्धार्थ कांबळे यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला होता. गेल्या आठवड्यात कांबळे यांनी मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाचा तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.