तुमच्या फालतूगिरीमुळे उद्धव ठाकरे रस्त्यावर; भाजप नेत्याचा राऊतांवर निशाणा

111

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भातील एक पत्र राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले आहे. याच पार्श्वभूमीवरून बोलत असताना माळशिरस मतदारसंघाचे भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांनी राऊतांनावर निशाणा साधला आहे.

सनसनाटी निर्माण करण्याकरता राऊतांचे आरोप – फडणवीस

दरम्यान संजय राऊतांच्या फडणवीसांनी उत्तर दिले आहे. राऊत यांचा आरोप फक्त सनसनाटी निर्माण करण्याकरता आहे. सुरक्षेचे विषय राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. तसेच कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणे त्यापेक्षाही चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या उत्तरांवर संजय राऊतांनी ट्वीट करत हे जबाबदार गृहमंत्र्यांचे उत्तर नाही असे म्हटले.

राम सातपुते काय म्हणाले? 

संजय राऊतांच्या या ट्वीटला प्रत्युत्तर देताना भाजप युवा आमदार राम सातपुते यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. राम सातपुते म्हणाले की, ‘तुम्ही सत्तेसाठी सोनियाचे तळवे चाटले त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्ही कधीच गमावला आहे. तुमच्या असल्या फालतूगिरीमुळेच उद्धव ठाकरेंना दोन मुलांचे राजकीय भविष्य खुटीला टांगून रस्त्यावर यायची वेळ आली आहे.’

राऊतांचे पत्र 

New Project 2023 02 22T192212.223

(हेही वाचा – धनुष्यबाणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर खासदार शेवाळेंची प्रतिक्रिया; म्हणाले….)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.