डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचं 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा दिला होता. त्यावर टीका करताना भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी टीका केली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचं 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा कल्याण डोंबिवलीमधील एका कार्यक्रमात बोलताना दिला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंत्री आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
‘आदित्य ठाकरेंनी पर्यटनाचा आनंद लुटला पाहिजे’
कल्याण डोंबिवलीमधील विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद शाधला. त्यावेळी केलेल्या वक्तव्यावर भाजपने टीका केली. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीत पर्यटनासाठी आले होते, त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटला पाहिजे होता. मात्र त्यांना दिवसाढवळ्या स्वप्न पडायला लागली आहे. 2024 ला पुन्हा सत्तेत येणार त्यांचा हा जो म्हणण्याचा अर्थ होता, तो त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे. त्यांच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे, असे मला वाटते असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – चिंतेची बाब! सिगारेटपेक्षा ‘या’ पदार्थांची शाळकरी विद्यार्थ्यांना ओढ)
काय केलं आदित्य ठाकरेंनी वक्तव्य
एमआयडीसी येथील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी राज्यात आपल्या सरकारच्या काळात विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणने शक्य झाले, दिल्लीतून देखील विकासासाठी निधी आला पाहिजे, असे बोलत असताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणं शक्य होईल, असे वक्तव्य करत शिवसेनेचे 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा दिला होता.