भाजप आमदार सभागृहात करू लागले म्याव… म्याव…!

देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम आरक्षणावरुन सपाचे आमदार अबू आझमी यांच्यावर देखील टोला हाणला. मात्र गॅलरीत बसलेल्या भाजप आमदारांकडून म्याव... म्याव... असा आवाज आला.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार पासून सुरू झाले असून, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरले. यावेळी त्यांनी मुस्लिम आरक्षणावरुन सपाचे आमदार अबू आझमी यांच्यावर देखील टोला हाणला. मात्र गॅलरीत बसलेल्या भाजप आमदारांकडून म्याव… म्याव… असा आवाज आला. विशेष म्हणजे यावेळी समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील बसले होते. त्यामुळे भाजप आमदारांचे हे म्याव म्याव नेमकं कुणाला होते, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

संविधानाप्रमाणे मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही, हे मी सत्तेत असताना म्हणालो होतो. मात्र तेव्हा अबू आझमी आंदोलन करायचे. आता मात्र त्यांचे आंदोलन बंद झाले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. याच दरम्यान मागे गॅलरीत बसलेल्या भाजप आमदारांनी म्याव… म्याव… असा आवाज काढला. विशेष म्हणजे यावेळी अबू आझमी हे सभागृहात उपस्थित नव्हते.

(हेही वाचाः वीज कनेक्शन तोडणीवर अजित पवार यांची मोठी घोषणा!)

समाजवादी पक्षाच्या आमदारांची घोषणाबाजी

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समाजवादी पक्षाने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा समाजवादी घटक पक्ष आहे.  मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी समाजवादी पक्षानं केली आहे. समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी यासाठी फलक घेऊन विधिमंडळ परिसरात घोषणा दिल्या. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात प्रस्ताव आणण्याची मागणीदेखील त्यांनी केली. प्रस्ताव न आणल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा देखील समाजवादी पक्षाच्या या आमदारांनी दिला आहे.

अस्लम शेख यांचे स्पष्टीकरण

मुस्लिम आरक्षण, सीएए, एनआरसीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, मंत्री अस्लम शेख यांनी सरकारच्या वतीनं उत्तर दिले. आम्ही मुस्लिम आरक्षणाशी कटिबद्ध आहोत. पुढील काही दिवसांत याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असे अस्लम शेख म्हणाले. राज्यात एनआरसी, सीएए विरोधात आंदोलने झाली आहेत. त्यामुळे त्यावर बोलण्याचा प्रश्नच येत नाही, असं देखील त्यांनी पुढे म्हटले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here