Jayant Patil यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप; म्हणाले…

239
Jayant Patil यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप; म्हणाले...

भाजपाच्या आमदाराने कोव्हिड काळात मेलेल्या व्यक्तीच्या नावे कोट्यावधी उकळले, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान केला. (Jayant Patil)

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे मायणी येथे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सन २०२० मध्ये देशभरात कोरोना रोगाचा संसर्ग व फैलाव झाला होता. कोव्हिड-१९ च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचे आढळून आले आहे. (Jayant Patil)

(हेही वाचा – जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाणार; Kathua Terror Attack नंतर सरकारचा इशारा)

मृत व्यक्तीला जीवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केले

या रूग्णालयामध्ये कोव्हिड-१९ काळात उपचारादरम्यान २०० ते २५० रूग्णांचा मृत्यू झाला होता. असे मृत्यू पावलेल्या रुग्णांना सुमारे दहा दिवस ते तीन महिन्यानंतर जिवंत आहेत असे दाखवून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दहा ते बारा दिवस उपचार द‍िला आहे असे दाखव‍िले आहे, आणि रुग्णांचे खोटे फोटो वापरून शासनाच्या सवलतींचा लाभ घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला. (Jayant Patil)

महाविकास आघाडी सरकारने कारवाई केली पण सत्तांतर झाले कारवाई शिथिल केली

रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्यावर तत्कालीन आरोग्यमंत्री टोपे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या सेंटरमध्ये चाललेल्या गैरप्रकारांबाबत चौकशी सम‍िती नेमली. चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले. टोपे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत राज्यात सत्तांतर झाले आणि ही कारवाई बंद करण्यात आली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. (Jayant Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.