मुंबई महापालिकेचा ५०० कोटींचा भूखंड घोटाळा!

मुंबईचा विकास आराखडा मंजूर करताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. पंरतु मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारमुळे आता उद्याने व खेळाचे उद्याने पूर्णपणे नामशेष झाले आहेत. अशा परिस्थितीत मनपाच्या ताब्यातील उद्यानाकरिता आरक्षित, कोणतेही अतिक्रमण नसलेला बांधकाम योग्य भूखंड अजमेरा बिल्डरला अदलाबदलती देण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी केला.

मुंबईकरांची हक्काची जमीन बिल्डरच्या घशात

या बदल्यात अजमेरा बिल्डरकडे असणारा बांधकाम अयोग्य व पर्यावरणविषयक परवानग्याच्या कचाट्यात अडकणारा भूखंड मुंबई महापालिकेने माहुल पम्पिंग स्टेशनकरिता ताब्यात घेतला आहे. परंतु यातील खरा गैरव्यवहार स्पष्ट आहे, तो म्हणजे अजमेरा बिल्डरची पर्यावरणविषयक परवानग्या मिळवण्याच्या अनंत अडचणीतून सुटका करणे आणि या आदलाबदलीच्या व्यवहारात त्याचा सरळ सरळ ५०० कोटींचा फायदा करून देणे! त्यामुळे मुंबईकरांची हक्काची जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट सत्ताधरी सेना व महाविकास आघाडीच्या साथीदारांनी घातल्याचे त्यांनी योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्वरीत स्थगितीचे आदेश निर्गमित करावे अन्यथा मला योग्य त्या कायदेशीर बाबीचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा योगेश सागर यांनी दिला आहे.

यासंबंधीचा व्हिडिओ फेसबुकवरही पहा
https://fb.watch/ao_DMo2L5p/

(हेही वाचा मध्य रेल्वेच्या ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द! कारण जाणून घ्या…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here