विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीची सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली असून ५ डिसेंबरला शपथविधी निश्चित झाला आहे. मात्र भाजपाने शिवसेनेच्या काही मंत्र्यांबाबत आक्षेप घेतल्याची माहिती आहे. यामध्ये माजी मंत्री आणि धाराशीवचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपाकडून विरोध होत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे सावंत यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
शिंदे यांच्या विश्वासातील
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथवून भाजपा-शिवसेना युती सरकार स्थापन झाले. त्यानंतर वर्षभरात अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील ४० आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये समाविष्ट झाले. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याकडे आरोग्य खात्याचा तसेच धाराशीवचे पालकमंत्री म्हणून पदभार होता. त्यामुळे शिंदे यांच्या विश्वासातील आमदार म्हणून ते ओळखले जातात.
(हेही वाचा – आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने राज्याचे Waqf Board केले विसर्जित)
शिंदेंचा विश्वास; जनतेचा रोष
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सावंत हे परांडा विधानसभा मतदार संघातून केवळ १,५०९ मताधिक्य मिळवत विजयी झाले तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रंबागुल यांनी १२,६९८ मते मिळवली. त्यामुळे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राहुल मोते (Rahul Mote) पराभूत झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. सावंत यांच्याविरोधात स्थानिक पातळीवरही रोष असून प्रचारफेरीदरम्यान एका गावात त्यांची स्थानिक मतदारांशी वाद झाला होता.
(हेही वाचा – Solapur Accident : सोलापूरात भीषण अपघात; २ ठार तर ६ जण गंभीर जखमी)
भ्रष्टाचाराचे आरोप
सावंत यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागातील तथाकथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांची प्रतिमा मलीन झाली होती. अँब्युलन्स खरेदी घोटाळा, अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच पदोन्नती सारख्या प्रकरणांमध्ये त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यामुळे भाजपाकडून सावंत यांच्या मंत्रिमंडळातील समवेशाबद्दल आधीच आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे.
शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
सावंत हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळचे मानले जातात. शिंदे यांनी बंड केल्यानंतर सावंत यांनी त्यानं साथ दिल्याने या आमदारांना शिंदे नाराज होऊ देत नाहीत. या पार्श्वभूमीवर शिंदे आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community