मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी रविवार, २५ फेब्रुवारी रोजी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर मात्र भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी जरांगे पाटलांवर प्रतिहल्ला करायला सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी तर एक सूचक ट्विट केले आहे.
नेम चुकायचा नाय…!
ज्या दिवशी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. त्याच दिवशी फडणवीस हे एका शस्त्र प्रदर्शनाला गेले होते. तिथे त्यांनी मशीन गन हातात घेऊन नेम धरत असल्याचा फोटो काढला आणि तो फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांनी या फोटोचा उल्लेख करत फडणवीसांचा हा डाव होता. मराठा आंदोलकांवर गोळीबार करायचा डाव होता, असा आरोप करत पुन्हा टीका केली होती. त्यानंतर मात्र भाजपच्या आमदारांनी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका करायला सुरुवात केली.आमदार प्रसाद लाड यांनीही हाच फोटो ट्विट करत, ‘नेम चुकायचा नाय…!’ असे विधान केले आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर भाजपचा हल्लाबोल सुरूच राहणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण सोमवारी विधीमंडळात भाजपच्या सर्व आमदारांची तातडीने बैठक घेऊन मराठा आरक्षणावर रणनीती ठरवण्यात आली. त्यानंतर मंगळवारी प्रसाद लाड यांनी वरील ट्विट करणे या योगायोग निश्चित नाही.
Join Our WhatsApp Community