शिवसेनेच्या हिंदुत्वावरील बॅनरबाजीवर भाजपचे टीकास्त्र 

137

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक कुत्रा येतो आणि औरंगजेबाच्या कबरीसमोर डोके ठेवतो, हिंदूंना जाहिरपणे ललकारतो. त्यावर कसलीही कारवाई होत नाही, कसलाही गुन्हा दाखल होत नाही. एकीकडे हनुमान चालिसा पठण केले तर गुन्हे दाखल होतात. खुर्चीसाठी विचारधारा सोडली बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले आणि मुंबई शहरात सगळीकडे हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता? तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा १५ मिनिटांत ओवैसीला उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दिला आहे.

१५ मिनिटांत औवेसीला उत्तर देऊ

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादेत औरंगजेबाच्या कबरीसमोर डोके ठेवले. त्यावरून महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून भाजपा – मनसेसह सत्ताधारी पक्षाकडूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणेपाठोपाठ मोहित कंबोज यांनीही शिवसेनेला कोंडीत पकडत तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा, १५ मिनिटांत औवेसीला उत्तर देऊ असे म्हटले आहे. शेरगील उस्मानी हिंदुंवर टीप्पणी करतो. त्यांच्यावर कारवाई होत नाही परंतु हनुमान चालीसा लावू म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. राजद्रोहाची कलमं लावली जातात. १ हजार मस्जिदींवर भोंगे लावण्याची परवानगी दिली. वाह रे वाह ठाकरे सरकार असा टोला लगावला आहे.तसेच ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार झाले आहे.

(हेही वाचा ‘औरंगजेबाला आम्हीच कबरीत टाकलं; तुमचंही तेच करणार’, राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल)

मनसेचा इशारा

अकबरुद्दीन औवेसी यांनी औंरगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर मनसेनेही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. एक दिवस त्या औरंगजेबच्या थडग्या शेजारीच तुझ थडगे आम्ही बांधल्याशिवाय शांत बसणार नाही. हा हैदराबादचा कुत्रा आहे, त्याच्या अंगात पाकिस्तानाच रक्त आहे. अशा शब्दात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. औरंगाबादला वारंवार यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचे राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळाले नाही. औरंगजेब काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सगळे सांगेल. औरंगजेबाच्या कबरीवर महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारले आहे. जे औरंगजेबाचे झाले तेच त्याच्या भक्तांचेही होईल, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.